
नवी दिल्ली : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. गृहमंत्र्यांचे विधान असंवेदनशील असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. तर, ‘‘सारे काही नशिबावर सोडायचे काय,’’ असा उपरोधिक सवाल काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला आहे.