
भाजप प्रवक्त्याकडून सोनिया गांधीबद्दल अपशब्द; कॉंग्रेसची नड्डांकडे तक्रार
नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. या संबंधीच्या चर्चेदरम्यान आता भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी गोवा बेकायदेशीर बार प्रकरणावर टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली. यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे. भविष्यात अशी भाषा वापरल्यास मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान भाजप अध्यक्षांना लिहील्या गेलेल्या पत्रात सांगण्यात आले आहे की, भारतीय संस्कृतीबाबत बोलणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेते आणि प्रवक्त्यांकडून देशाती सम्मानित महिलांबाबत, खासकरून एका राष्ट्रीय पक्षाच्या 75 वर्षीय अध्यक्षाविरुद्ध वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी अपशब्द वापरणे भाजपची महिलाविरोधी विचारसरणी दर्शवते. अशा आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे देशाच्या राजकारणाची पातळी घसरत चालली आहे.
हेही वाचा: बेकायदेशीरपणे एकत्र आलेल्या 'आरे'तील आंदोलकांना मुंबई पोलिसांच्या नोटीसा
काँग्रेसने या पत्रात म्हटले आहे की, आमचे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्षांना आवाहन आहे की, तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या लज्जास्पद आणि असभ्य वक्तृत्वाबद्दल तुम्ही देशातील महिलांची माफी मागावी. त्याच वेळी, तुमच्या प्रवक्त्या आणि नेत्यांना राजकारणाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावण्यासाठी आणि द्वेषयुक्त वक्तव्यांपासून दूर राहण्यासाठी आणि राजकारणाची प्रतिष्ठीत पातळी राखण्यास सांगण्यात यावे.
हेही वाचा: केंद्राकडून लवकरच दिलासा, कॅन्सर-मधुमेहवरील औषधं 70 टक्क्यांपर्यंत होणार स्वस्त!
Web Title: Congress Slams Bjp Over Objectionable Remarks Against Sonia Gandhi By Bjp Spokesperson On Tv Debate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..