बेकायदेशीरपणे एकत्र आलेल्या 'आरे'तील आंदोलकांना मुंबई पोलिसांच्या नोटीसा

Aarey Protest
Aarey ProtestSakal

मुंबई - मुंबई पोलिसांनी आरे कॉलनी येथे मेट्रो कारशेडच्या बांधकामाविरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांना सीआरपीसी अंतर्गत नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी या संदर्भात माहिती दिली आहे. (Aarey protestors news in marathi)

Aarey Protest
"ज्यांना पाचवेळा आमदार, मंत्री बनवलं त्यांनीच गद्दारी केली" - आदित्य ठाकरे

शहर पोलिसांनी गोरेगावच्या पश्चिम उपनगरातील आंदोलनस्थळी बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करत CrPC कलम 149 अंतर्गत नोटिसा जारी करण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांत तबरेझ सय्यद आणि जयेश भिसे या दोन आंदोलकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना बेकायदेशीरपणे एकत्र येऊन कायद्याचे उल्लंघन न करण्याचा इशारा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो आंदोलक "सेव्ह आरे" बॅनर घेऊन निदर्शने करत आहेत. अनेक फलकांवर नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करून शहरातील वनक्षेत्र वाचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड लावले असून कारशेडच्या जागेजवळ कोणालाही जाण्याची परवानगी नसल्याच्या सूचना केल्या आहे.

Aarey Protest
Mumbai Metro: 'आरे'तच कारशेड होणार; शिंदे फडणवीस सरकारने बंदी उठवली

आंदोलकांपैकी अमृता भट्टाचार्य म्हणाल्या, "लोक शहराच्या विविध भागातून निषेधाच्या ठिकाणी येतात आहे. मात्र त्यांना नोटीस देण्यासाठी पोलीस आंदोलकांची नावे आणि पत्ते विचारत आहेत.

झोन 12 चे पोलिस उपायुक्त (डीसीपी) सोमनाथ घार्गे म्हणाले, "नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख आणि विविध गटांचे नेतृत्व करणारे लोक निदर्शने करण्यास परवानगी मागण्यासाठी पोलिसांकडे येत आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. आम्ही त्यांना सीआरपीसीच्या कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत.

Aarey Protest
आरे आंदोलनात सहभागी झालेले आदित्य ठाकरे बाळ; नितेश राणेंच खोचक ट्वीट

राज्यात सत्तांतर झाल्यांतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी प्रस्तावित कारशेडची जागा आरे कॉलनीतून कांजूरमार्ग येथे हलवली होती. परंतु हा मुद्दा कायदेशीर वादात अडकला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com