Jairam Ramesh : ‘अच्छे दिन’ऐवजी कर्जाचे दिवस : जयराम रमेश
CongressVsModi : भारतात बचत दर घसरत असून कर्जाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश यांनी देशातील आर्थिक असमतोलावर टीका करत 'कर्जाचे दिवस आले' असा टोला लगावला.
नवी दिल्ली : बचतीचे घटते प्रमाण आणि वाढत्या कर्जाच्या आकड्यांच्या आधारे काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले. वाढत्या कर्जामुळे ‘अच्छे दिन’ नव्हे तर कर्जाचे दिवस आले आहेत, असा टोला काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी लगावला.