राजीव त्यागींच्या मृत्यूप्रकरणी सांबित पात्रा यांच्यासह एका वृत्तवाहिनीविरोधात तक्रार

टीम ई सकाळ
Friday, 14 August 2020

उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू तिवारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली असून सांबित पात्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि एका हिंदी वृत्तवाहिनीवरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी हे का वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सामील झाले होते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू तिवारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली असून सांबित पात्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर यावरून उलटसुलट चर्चा असून अनेकांनी सांबित पात्रा यांना अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. सोशल मीडियावर काही काळ हॅशटॅग #ArrestSambitPatra असा ट्रेंडही होता. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर सांबित पात्रा आणि एका हिंदी वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाविरोधात मोठ्या प्रमाणात भडकलेले दिसून आले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरूनच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी ओडिशा प्रदेश युवक काँग्रेसनेही तक्रार दाखल केली आहे.

चर्चासत्राच्या कार्यक्रमात भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी राजीव त्यागी यांच्याविरोधात अत्यंत अपमानजनक भाषेचा वापर केला असल्याचे मत सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केले आहे. यावेळी सांबित पात्रांना सूत्रसंचालकांने कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला दिसला नाही. चर्चासत्र संपल्यावर राजीव त्यागी यांची आरोग्यस्थिती बिघडली त्यामुळे त्यांनी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, रुग्णलयात पोहोचल्यावर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यागी यांना कुठल्याही प्रकारचा ह्रदयाचा त्रास नव्हता. दरम्यान, एका हिंदी पत्रकाराने केलेल्या ट्विटच्या माहितीआधारे लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात सांबित पात्रा आणि एका हिंदी वृत्त वाहिनीच्या सूत्रसंचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress UP Spokesperson anshu awasthi lodged a complaint against sambit patra