esakal | राजस्थान पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसची हवा; भाजप पिछाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Narendra Modi

राजस्थान पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसची हवा; भाजप पिछाडीवर

sakal_logo
By
अमित उजागरे

जयपूर : राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये जयपूर, जोधपूर, भरतपूर, दौसा, सवाईमाधोपूर आणि सिरोही येथे तीन टप्प्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे. १५६४ जागांसाठी झालेल्या निवडणुकाचे निकाल समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसनं जोधपूरमध्ये आपला झेंडा फडकावला आहे.

राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राजस्थानात १५६४ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ६७० जागा तर भाजपनं ५५१ जागा जिंकल्या. तसेच बसपा ११, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी ४० जागांवर विजय मिळवला. तसेच जिल्हा परिषद निवडणुकात भाजप ९०, काँग्रेस ९९ तर बसपानं ३ जागांवर तर अपक्ष उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवला.

loading image
go to top