बाजवांकडे जाहीरनामा तर जाखडांकडे प्रचाराची धुरा; अंतर्कलह शांत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

प्रतापसिंह बाजवा हे कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधी गटातील होते.
navjyot singh sidhu
navjyot singh sidhuesakal

नवी दिल्ली : नवज्योतसिंग सिद्धूंच्या(Navjot Singh Sidhu) महत्त्वकांक्षेमुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाढलेला अंतर्कलह शांत करण्यासाठी कॉंग्रेसने जाहीरनामा(Manifesto) समिती आणि प्रचार समिती नेमून त्यात सर्व गटातटांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रतापसिंह बाजवा(rajyasabha Mp pratapsinh bajwa) यांना जाहीरनामा समितीचे तर, सुनील जाखड(sunil jakhad) यांना प्रचार समितीचे प्रमुख बनविण्यात आले आहे.

navjyot singh sidhu
निवडणूका लांबणीवर; पुणे महापालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता

प्रतापसिंह बाजवा हे कॅप्टन अमरिंदरसिंग(Amarinder Singh) यांच्या विरोधी गटातील होते. मात्र कॅप्टन काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर बाजवा यांच्या नाराजीचा रोख सिद्धू यांच्याकडे वळला होता. अलीकडेच बाजवा यांचे बंधू फतेहसिंह बाजवा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदाच्या निमित्ताने कॉंग्रेस नेतृत्वाने प्रतापसिंह बाजवा यांना चुचकारले आहे. त्याच धर्तीवर सिद्धूंविरुद्ध आक्रमकपणे दंड थोपटणारे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना प्रचार समितीच्या माध्यमातून मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारीला होणार असून कॉंग्रेसने निवडणुकीसाठी आज या दोन्ही समित्यांची घोषणा केली. अर्थमंत्री मनप्रीत बादल(Finance Minister Manpreet Badal) यांना जाहीरनामा समितीचे प्रभारीपद देण्यात आले आहे.तर डॉ. अमरसिंह यांना संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले. खासदार रवनीत बिट्टू यांना प्रचार समितीचे संयोजकपद सोपविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com