
नवी दिल्ली : सरत्या मे महिन्यात २.०१ लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. मागील वर्षीच्या मे महिन्यात १.७२ लाख कोटी रुपयांची करवसुली झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात झालेली करवसुलीतील वाढ १६.४ टक्क्यांनी जास्त आहे. याआधी एप्रिल महिन्यात २.३७ लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती. ती आतापर्यंतची सर्वाधिक मासिक करवसुली होती.