आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा! कोविड वीमा योजनेला मुदतवाढ

१९ एप्रिल २०२२ पासून या वीमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
Health Worker
Health WorkerSakal

नवी दिल्ली : कोविड काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या वीमा योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत परिपत्रक काढलं आहे. (Consolation to health workers Extension of Centre covid Insurance Scheme)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (PMGKP) आणलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या वीमा योजना आणखी १८० दिवसांसाठी अर्थात सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. १९ एप्रिल २०२२ पासून या वीमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविडच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना याची मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अतिरिक्त आरोग्य सचिवांनी हे परिपत्रक काढलं असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही या योजनेला मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

PMGKP ही वीमा योजना ३० मार्च २०२० रोजी लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये सर्वसमावेशक ५० लाखांचा वैयक्तिक अपघात वीम्याचा लाभ देण्यात आला आहे. २२.१२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार होता. यामध्ये कम्युनिटी आरोग्य कर्मचारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांचा कोविडच्या रुग्णांशी थेट संबंध येतो ज्यामुळं त्यांचं जीवन हे कायम हायरिस्कमध्ये असतं. ही योजना लागू झाल्यापासून आत्तापर्यंत १९०५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून या सर्वांचे वीमा दावे निकाली काढण्यात आले आहेत.

दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गानं डोक वर काढलं असून गेल्या चोवीस तासात १,२४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तत्पूर्वी तीन-चार दिवस आधी ही रुग्णसंख्या दुप्पटीनं वाढताना दिसून आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com