

Proposed delimitation may expand Lok Sabha strength to 850 seats, reshaping India’s political map.
sakal
नवी दिल्ली : लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबरोबरच उपलब्ध ताज्या जनगणनेच्या (२०११) आकडेवारीच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची तरतूद असलेली विधेयके सरकारतर्फे आज सार्वजनिक करण्यात आली. या तरतुदींनुसार लोकसभेतील सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यापैकी ८१५ जागा राज्यांसाठी, तर ३५ जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील.