
सुरजेवालांची जीभ घसरली; म्हणाले, सीता मातेचे जसे चीरहरण झाले...
उदयपूर : राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार व काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांची भाजपवर निशाणा साधताना जीभ घसरली. त्यांना द्रौपदीच्या चीरहरणाचे उदाहरण द्यायचे होते. परंतु, ‘ज्याप्रमाणे सीता मातेचे चीरहरण झाले त्याप्रमाणे भाजप लोकशाहीचे चीरहरण करू पाहत आहे’ असे ते म्हणाले. (Controversial statement made by Congress leader Randeep Surjewala)
सुरजेवाला हे शुक्रवारी (ता. १०) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत होते. उद्या लोकशाहीच्या बहुमताचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे. जे लोक पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, ईडी, सीबीआयच्या जोरावर इथपर्यंत आले ते याआधीही तोंडवर पडले होते आणि यावेळेसही पडेल. लबाडीचे पांघरूण घातलेल्या लोकांनी जसे एकेकाळी सीता मातेचे चीरहरण केले होते तसे आता भाजपचे लोक लोकशाहीचे चीरहरण करू पाहत आहे. ते लोक हरतील, असेही रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) म्हणाले.
हेही वाचा: मुंबई : गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या
काँग्रेस (Congress) नेत्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social media) लोकांनी त्यांना घेरले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहे. रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांना सीता मातेचे चीरहरण केव्हा झाले, असा प्रश्न विचारत आहे.
Web Title: Controversial Statement Made By Congress Leader Randeep Surjewala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..