कलम ३७० येईपर्यंत दुसरा झेंडा घेणार नाही; मेहबुबा मुफ्ती यांचे वादग्रस्त विधान

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

आपल्या टेबलवर पीडीपीच्या झेंड्याबरोबर जम्मू काश्‍मीरचा झेंडा ठेवला होता. जोपर्यंत माझा झेंडा परत येत नाही, तोपर्यंत दुसरा झेंडा उचलणार नाही. सध्या माझा झेंडा माझ्यासमोर आहे, असे त्या म्हणाल्या.

श्रीनगर - जोपर्यंत जम्मू काश्‍मीरला कलम ३७० बहाल होत नाही, तोपर्यंत कोणताही दुसरा ध्वज हाती धरणार नाही, असे वादग्रस्त विधान पीडीपीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.  गुपकर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या टेबलवर पीडीपीच्या झेंड्याबरोबर जम्मू काश्‍मीरचा झेंडा ठेवला होता. जोपर्यंत माझा झेंडा परत येत नाही, तोपर्यंत दुसरा झेंडा उचलणार नाही. सध्या माझा झेंडा माझ्यासमोर आहे, असे त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 चौदा महिन्यांच्या कैदेनंतर बाहेर आलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी आता राजकीय हालचाली सुरू केल्या. बऱ्याच कालखंडानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, की आपला पक्ष जम्मू काश्‍मीरला पूर्वीचा दर्जा मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. भारताला केवळ जम्मू काश्‍मीर हवे आहे, काश्‍मीरचे लोक नकोत. कलम ३७० जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत दुसरा झेंडा हातात घेणार नाही. त्या म्हणाल्या, की भाजपने भारतीय राज्यघटनेवर आक्रमण केले असून नागरीविरोधी कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. सध्याच्या हुकुमशाही राजवट कायम राहणार नाही. हिटलरच्या हुकुमशाहीचा शेवट झाला होता, असे त्या म्हणाल्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काश्‍मीरी नागरिकांनी मोठे बलिदान दिले असून त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. काश्‍मीरसाठी रक्त सांडण्यासाठी मी सर्वात पुढे असेन. आम्ही एक असून आम्ही एकत्रपणे लढा देत आहोत. 
- मेहबुबा मुफ्ती, पीडीपी नेत्या

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial statement of Mehbooba Mufti