

Manoj Bajpayee Film Faces Heat; Director Issues Public Apology
Sakal
मनोज बाजपेयी यांचा अभिनय आणि नीरज पांडे यांचे दिग्दर्शन म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. पण त्यांच्या आगामी 'घूसखोर पंडत' या चित्रपटामुळे सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. चित्रपटाचे नाव आणि त्यातील आशयावरून ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली असून, हे प्रकरण आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.