Bharat Mata Kerala Controversy
देश
Bharat Mata Kerala: भारतमातेचं छायाचित्र अन् केरळमध्ये वाद! सरकारचा एक निर्णय, डावे-उजवे भिडले
Bharat Mata Kerala: राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमामुळं या वादाला तोंड फुटले आहे. पर्यावरण दिनानिमित्त केरळच्या राजभवनात शेतकरी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Bharat Mata Kerala Controversy : केरळमध्ये भारत मातेची प्रतिमा वापरण्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (माकप) प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारत मातेच्या छायाचित्राचा वापर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसारासाठी केला जात असल्याचा आरोप करत ‘माकप’च्या कार्यकर्त्यांनी भारत मातेच्या छायाचित्राविरोधात राज्यभरात मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणदिनाचे औचित्य साधून राजभवनामध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गुरुवारी दरबार हॉल येथे घेण्यात आल्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे.