
Moshi Slaughter House: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्यांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मोशी येथील गावच्या हद्दीत कत्तलखान्यासाठी जागा आरक्षित केली आहे. याला स्थानिक नागरिक, हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विरोध केला.
दरम्यान, मोशी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात येईल आणि त्या ठिकाणी गोशाळा आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित कमिटीसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.