रजनीकांतचे जामिया हिंसाचारावर ट्विट; नेटकरी म्हणतात #ShameOnYouSanghiRajini

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

थलैवा रजनीकांतनेही आता जामिया प्रकरणावर ट्विटरवरून भाष्य केले आहे. पण त्याच्या या ट्विटवरून सोशल मीडियावर वाद होताना दिसत आहेत. तर काही जण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतानाही दिसत आहेत. यामुळेच ट्विटरवर #IStandWithRajinikanth आणि #ShameOnYouSanghiRajini असे दोन हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. 

चेन्नई : जामिया इस्लामिया लाठीचार्ज प्रकरण दररोज वेगळे वळण घेत आहे. येथील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध देशभरातून होत असतानाच, सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटत आहेत. बॉलिवूड कलाकार- निर्माते दिग्दर्शकांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. थलैवा रजनीकांतनेही आता या प्रकरणावर ट्विटरवरून भाष्य केले आहे. पण त्याच्या या ट्विटवरून सोशल मीडियावर वाद होताना दिसत आहेत. तर काही जण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतानाही दिसत आहेत. यामुळेच ट्विटरवर #IStandWithRajinikanth आणि #ShameOnYouSanghiRajini असे दोन हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील अनेक दिवस शांत असलेल्या रजनीकांत यांनी काल (ता. 19) रात्री हिंसाचाराप्रकरणी मौन सोडले. ट्विटमार्फत त्यांनी जामिया हिंसाचारावर आपले मत मांडले. या ट्विटमध्ये रजनीकांत म्हणतात की, 'कोणत्याही प्रकारच्या प्रश्नासाठी दंगली किंवा हिंसाचार हा काही पर्याय नाही. अशा वातावरणात प्रत्येत भारतीय नागरिकाने सावध असणे गरजेचे आहे, तसेच एकीने वागणे आवश्यक आहे. देशाची सुरक्षा व समृद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील ही सर्व स्थिती बघून मी व्यथित झालो आहे.' त्यांच्या या ट्विटला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यानी CAA बाबत बोलावे असे नेटकऱ्यांने म्हणणे आहे.

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रजनीकांत प्रमुख मुद्यावर न बोलता इतर गोष्टींवर बोलत आहेत. हिंसाचाराचे समर्थन नाहीच, पण विद्यार्थ्यांना विरोध करणेही चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. 2021 मध्ये होणाऱ्य़ा तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकांमध्ये ते स्वतः निवडणूक लढवणार आहेत, असे यापूर्वी त्यांनी जाहीर केले होते. 

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

 

 

 

या हिंसाचाराप्रकरणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या विषयावरून वाद-विवाद होताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर दररोज कोणी ना कोणी या विषयावरून वाद घालताना दिसतात. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversy on social media on Rajinikanth s tweet related to Jamia Milia