विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

टीम ईसकाळ
बुधवार, 18 डिसेंबर 2019

अभिनेता पुलकित सम्राट आणि निर्माते अशोक पंडित यांचे ट्विटरवॉर व्हायरल होत आहे. त्यांचे हे भांडण इतके व्हायरल झाले की, ट्विटरवर #Pulkit हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

नवी दिल्ली : जामिया इस्लामिया लाठीचार्ज प्रकरण दररोज वेगळे वळण घेत आहे. येथील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध देशभरातून होत असतानाच, सोशल मीडियावरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. बॉलिवूड कलाकार-दिग्दर्शकांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या विषयावरून वाद-विवाद होताना दिसत आहेत. अशातच अभिनेता पुलकित सम्राट आणि निर्माते अशोक पंडित यांचे ट्विटरवॉर व्हायरल होत आहे. त्यांचे हे भांडण इतके व्हायरल झाले की, ट्विटरवर #Pulkit हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फिल्म अँण्ड टेलिव्हिजन असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्ममेकर अशोक पंडित यांच्या एका ट्विटमुळे हा सगळा वाद सुरू झाला. त्यांनी ट्विट केले होते की, जामियामधील विद्यार्थ्यांची वर्तणूक ही लोकशाहीविरूद्ध, धर्मनिरपेक्षतेविरूद्ध व असभ्य होती. त्यांच्यावरील कारवाई ही योग्य होती. कोणीही कायद्याच्या पुढे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश उत्तम प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांनी असे गुंडांसारखे वागू नये.' त्यांच्या या ट्विटवर पुलकित म्हणतो की, 'आपला देश आता लोकशाहीविरूद्ध, धर्मनिरपेक्षतेविरूद्ध व असभ्य होत चाललाय, अशा देशात मी जन्मलो नाही. एकता हा आपला धर्म आहे. मी विद्यार्थ्यांना समर्थ करतो.'

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

इथून सुरू झालेले ट्विटरवॉर वाढत गेले. पुलकित म्हणला मी या देशातल्या जबाबदार नागरिकाशी बोलत आहे, तुम्ही लवकर बरे व्हा... यावर अशोक पंडित यांनी रिप्लाय दिला.

ट्विटरवर कलाकारांवर भडकले नेटकरी; म्हणतात, #ShameonBollywood

यानंतर पुलकित म्हणाला तुम्ही खूप रिकामे दिसता, यावर अशोक पंडित म्हणाले की, रिकाम्यांना सगळं जग रिकामंच दिसतं, तू लवकर बरा हो. या दोघांचे हे ट्विटरवॉर प्रचंड व्हायरल झाले आहे.

जामिया मिलिया प्रकरणात सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. यात अनेक कलाकारांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. यात सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, विकी कौशल, स्वरा भास्कर अनुराग कश्यप यांनी आंदोलनाला समर्थन दिले.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter war in between Actor Pulkit Samrat And Producer Ashok Pandit on Jamia protest