Tiger Reserve New Rules
esakal
Mobile phones banned during jungle safari at Corbett Tiger Reserve : उत्तराखंडमधील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. इथे हिरण, हत्ती, आणि वाघ असे विविध प्राणी बघायला मिळतात. यावेळी पर्यटकांकडून मोबाईलमध्ये या प्राण्यांचे फोटो काढले जातात. मात्र, आता पर्यटकांना मोबाईलमध्ये फोटो काढता येणार नाही. कारण सफारीदरम्यान पर्यटकांच्या मोबईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्येही सध्या नाराजीचा सूर आहे.