कोरोनाचा अधिवेशनावरही परिणाम; पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात बदल

Parliament
Parliament

देशात येणाऱ्या 14 सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आता या सुरू होणाऱ्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजात काही बदल करण्यात आले आहेत. यातलाच एक बदल म्हणजे पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास  रद्द करण्यात आला आहे, पण शून्य प्रहरात काहीही बदल केलेला नाही. याकाळात पहिल्या दिवशी लोकसभचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लोकसभा चालणार आहे.  उर्वरित काम दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत केलं जाईल. राज्यसभाचे कामकाज पहिल्या दिवशी (14 सप्टेंबर) दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत चालणार आहे. पण इतर दिवशी राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान चालणार आहे. तसेच या अधिवेशनात शनिवारी आणि रविवारी सुट्टीही नसणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात महिन्यातील 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 18 बैठका होणार आहेत. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी खासदारांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक आणि केंद्रीय गृह, आरोग्य व संशोधन विभागांच्या सचिवांशी बैठक घेतली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसात दोन्ही सदनांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोरोनाच्या पार्शभूमीवर अधिवेशनाअगोदर संसदेच्या सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून दोन्ही सदनांचे कामकाज केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शून्य प्रहर म्हणजे काय?
अधिवेशन काळात दुपारी १२ वाजताचा काळ हा शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. हा काळ दुपारी १२ वाजता सुरु होत म्हणून याला शून्य प्रहर असे म्हटले जाते. शून्य प्रहर एकूण ३० मिनिटांसाठी असतो, या वेळात एखाद्या सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यासाठी तीन मिनिटे मिळतात. दुपारी १ वाजण्यापूर्वी हा प्रहर पूर्ण झाला पाहिजे.शून्य प्रहर दरम्यान विषय मांडू इच्छिणाऱ्या सदस्यांना दैनंदिन सत्र सुरू होण्यापूर्वी संसद अध्यक्षांना सूचना देणे आवश्यक असते. शून्य प्रहर दरम्यान, दोन्ही सभागृहांमधील सदस्यांना तातडीने लक्ष देण्याची गरज असलेल्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी मांडण्याची संधी मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com