Omicron | 31st नंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

Corona Patient
Corona Patientesakal

संख्या वाढल्याने केंद्र सरकारने सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्य मंत्रालयाकडून प्रत्येक पालिका आय़ुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी झाले आहेत. (COVID19 India reports)

मागील 24 तासांत भारतात 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 8 हजार 949 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात एकूण 406 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या भारतातील सक्रिय रुग्णांचा आकडा 1 लाख 4 हजार 781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32% आहे. (Omicron in India)

ओमिक्रॉनने पाय पसरले....महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धास्ती वाढली आहे. याआधी देशात सहव्याधी असलेले आणि ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील एक व्यक्ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील होती.तर अन्य रुग्ण राजस्थानातील होता. (Omicron Patient in India )

सध्या देशात 1 हजार 431 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. याआधी ही आकडेवारी 1002 होती. ओमिक्रॉन झपाट्याने परसत असल्याचं स्पष्ट झालंय. याआधी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, आता महाराष्ट्रात 454 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीत 351 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासाची आहे.

70 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून समोर आलं आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्यांना सुचना जारी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com