Corona Updates: सावधान! संसर्ग पुन्हा वाढला; 24 तासांत 38 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

मागील दोन  दिवसांत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे आढळले होते. प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडाही 30 हजारांच्या खाली गेला होता. पण...

नवी दिल्ली: मागील दोन  दिवसांत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे आढळले होते. प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडाही 30 हजारांच्या खाली गेला होता. पण मागील 24 तासांत कोरोनाच्या 38 हजार 617 रुग्णांचे निदान होऊन 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही प्रतिदिन कोरोना रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांचा आकडा 89 लाख 12 हजार 908 झाला असून 1 लाख 30 हजार 993 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रिकव्हरी रेट वाढला-
दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जवळपास 92 टक्क्यांपर्यंत गेला आहे. आतापर्यंत देशात 83 लाख 35 हजार 110 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 44 हजार 739 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 46 हजार 805 आहे. 

प्रतिदिन रुग्णवाढीचा आढावा- 
  17 ऑगस्ट       65 हजार
 4 सप्टेंबर         83 हजार 341
 16 सप्टेंबर        96 हजार 424
10 ऑक्टोबर    73 हजार 272
24 ऑक्टोबर   53 हजार 370
16 ऑक्टोबर   29 हजार 163
17 ऑक्टोबर  38 हजार 617

मंगळवारी देशात कोरोनाच्या 9 लाख 37 हजार 279 चाचण्या पार पडल्या. तर आतापर्यंत देशात एकून झालेल्या चाचण्यांची संख्या 12 कोटी 74 लाख 80 हजार 186 झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona cases crosses 89 lakh in India