Coronavirus : दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय, देशात 9436 नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय, देशात 9436 नवे रुग्ण

Coronavirus : दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय, देशात 9436 नवे रुग्ण

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. आरोग्य मंत्रालयाने आज (रविवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,436 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 86,591 वर पोहोचली आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 4,37,93,787 लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण संसर्गापैकी सक्रिय प्रकरणे 0.22 टक्के आहेत, तर पुनर्प्राप्तीचा दर 98.59 टक्के आहे. दैनंदिन संसर्ग दर 4.15 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 3.59 टक्के नोंदवला गेला. दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा: संसर्ग वाढतोय! विमान प्रवासात आता मास्क बंधनकारक; DGCAचे निर्देश

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1723 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शनिवारी दिवसभरात एकूण 1845 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,34, 878 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 11743 सक्रिय रुग्ण संख्या आहे.

हेही वाचा: लहान मुलांनमध्ये हंगामी आजांरासह COVID-19 री-इन्फेक्शनचीही वाढ

Web Title: Corona Cases In India 28 August Covid 19 Cases Coronavirus Active Cases Death Cases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..