संसर्ग वाढतोय! विमान प्रवासात आता मास्क बंधनकारक; DGCAचे निर्देश

देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे.
Flight with mask
Flight with mask

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. यापार्श्वभूमीवर विमान प्रवासात आता मास्क लावणं बधनकारक करण्यात आलं आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात DGCA नं याबाबतचे निर्देश सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत. (Face masks mandatory on flights Aviation regulator as Covid cases spike)

DGCAनं आपल्या निर्देशांमध्ये म्हटलं की, "विमान कंपन्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही याची खात्री करावी. तसेच या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अचानक विमानांची तपासणी देखील केली जाईल. जर या नियमांचं उल्लंघन झालेलं आढळलं तर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल"

Flight with mask
शिंदे गटातील काही नाराज आमदार पुन्हा आमच्या संपर्कात - आदित्य ठाकरे

दिल्लीत १ ऑगस्टपासून १०० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सध्या दररोज ५ हून अधिक कोरोना ससंर्गबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दोन दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणंही वाढलं आहे.

Flight with mask
दहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा! 'प्रो कबड्डी'च्या धर्तीवर 'प्रो गोविंदा' होणार सुरु

दुसरीकडे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि १४ ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८८२ वर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com