कोरोनाचा चिनी अर्थकारणाला तडा

पीटीआय
मंगळवार, 30 जून 2020

जगाच्या अर्थकारणाचा कडेलोट करणाऱ्या कोरोनाने चीनच्या आर्थिक मनसुब्यांना मोठा धक्का दिला आहे. अब्जावधी डॉलरची गुंतवणूक असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) या प्रकल्पातील चीनची मोठी आर्थिक गुंतवणूक धोक्यात आली आहे.

नवी दिल्ली - जगाच्या अर्थकारणाचा कडेलोट करणाऱ्या कोरोनाने चीनच्या आर्थिक मनसुब्यांना मोठा धक्का दिला आहे. अब्जावधी डॉलरची गुंतवणूक असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) या प्रकल्पातील चीनची मोठी आर्थिक गुंतवणूक धोक्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आव्हानांची शर्यत

  • चीनकडून होणारा अर्थपुरवठा थांबला
  • कर्जाच्या भीतीने अनेक देशांनी कामे थांबविली
  • नायजेरियातील रेल्वे प्रकल्पाचे काम ठप्प
  • पाच देशांतील प्रकल्प कोरोनामुळे पूर्णपणे थांबले
  • चीनची सगळी गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता

६० अब्ज डॉलर - प्रकल्प रखडले

यांचा अर्थपुरवठा

  • चायना एक्झिम बँक
  • चायना डेव्हलपमेंट बँक

येथील कामे ठप्प
मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, कंबोडिया आणि श्रीलंका

पाचव्या प्रकल्पास फटका
अवाढव्य प्रकल्पांची साखळीच असलेल्या या प्रकल्पातील पाचवा प्रकल्प धोक्यात आला आहे. या माध्यमातून चीनला आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये स्वत:चा व्यापारी प्रभाव निर्माण करायचा होता. कोरोनाचा या प्रकल्पास जबर तडाखा बसल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक विभागाचे महासंचालक वँग शियाओलाँग यांनी नमूद केले.

जिनपिंग यांच्याकडून सुरुवात
शी जिनपिंग हे चीनमध्ये सत्तेत आल्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी या प्रकल्पास चालना दिली होती. आग्नेय आशिया, आखाती देश, आफ्रिका आणि युरोप खंड यांना समुद्र आणि जमीनमार्गे जोडले जाणार होते. चीनमधील शिनजियांग प्रांत आणि पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर या कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडले जाणार होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona cracks Chinese economy