देशात कोरोनाचा कहर थांबता थांबेना; आतापर्यंत महाराष्ट्रात दगावले सर्वाधिक रुग्ण

corona, covid 19
corona, covid 19

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव  झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 43.70 लाखांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे  89 हजार 706 नवीन रुग्ण आढळले असून 1115 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता भारतातील कोरोना झालेल्यांची संख्या 43 लाख 70 हजार 128 वर गेली आहे. भारतात सध्या कोरोनाने झालेल्या मृतांची संख्या 73 हजार 890 झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 74 हजार 894 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कंटेंनमेंट झोन वगळता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सुरुवातीला  इयत्ता 9 ते 12 च्या शाळा पुन्हा सुरूवात होतील. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जगभरात सध्या कोरोनाचे 27.47 दशलक्षाहूनही जास्त रुग्ण असून आतापर्यंत  8,93,290  मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या कोरोनाचा प्रसार 210 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशात झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारत अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोना रुग्ण असणारा दुसरा देश बनला आहे, देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 20,131 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर आंध्र प्रदेशात 10,601 कर्नाटकमध्ये 7,866  उत्तर प्रदेशात  6,622  आणि तामिळनाडूमध्ये  5,684 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याबरोबरच कोरोनाने झालेल्या मृतांच्या संख्येतही महाराष्ट्र अव्वल राज्यं ठरलं आहे.  गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 380 लोकांचा मृत्यू झाला आहे.  याशिवाय कर्नाटकात 146, तामिळनाडूमध्ये 87, आंध्र प्रदेशात 73 आणि उत्तर प्रदेशात 71 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com