Corona Updates: कोविड चाचण्यांचा 7 कोटींचा टप्पा पार; भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

corona_20lab_2.jpg
corona_20lab_2.jpg

नवी दिल्ली- आज एकूण सापडलेल्या कोरोना रुग्णांमधील 75 टक्के रुग्ण हे दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून सापडले आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती आज दिली. भारताने आतापर्यंत 7 कोटी कोरोनाच्या टेस्टचा टप्पा पार केला आहे. सध्या भारतात दिवसाला 14 लाख टेस्ट होत आहेत. ज्या 10 राज्यातून मुख्यत: हे 75 टक्के रुग्ण सापडले आहेत त्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडीसा, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. 

कोरोना लस : 80 हजार कोटी उपलब्ध होतील का? आदर पुनावालांचा प्रश्न

काय आहे महाराष्ट्रातील परिस्थिती?
आज महाराष्ट्रात 416 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.
आजवर एकूण 34,761 जण महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत. 
आजवर 13,00,757 इतके रुग्ण महाराष्ट्रात सापडले होते. 

काय आहे भारतातील परिस्थिती?
- सध्या भारताचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 59,03,933 इतका आहे.
- सध्या भारतात 9,60,969 इतके रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.
- सध्या भारतात 48,49,585 इतके रुग्ण बरे झालेले आहेत.
- सध्या भारतात 93,379 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  

बंदीनंतरही चिनी ऍप भारतात नव्या अवतारात; डाऊनलोड कोटींत

जगात काय घडतंय?
- जगात अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया आणि पेरू या देशात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. 
- लस यायच्या आधी जगात दोन दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो - जागतिक आरोग्य संघटना 
- जॉनसन अँड जॉनसन कोविड लशीचा कमी वेळात सकारात्मक परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com