esakal | पुढील तीन आठवडे भारतासाठी महत्त्वाचे; आरोग्य मंत्रालयाने केलं सतर्क

बोलून बातमी शोधा

corona test

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेविरुद्ध लढाईमध्ये पुढचे तीन आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.

पुढील 3 आठवडे भारतासाठी महत्त्वाचे; आरोग्य मंत्रालयाने केलं सतर्क
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेविरुद्ध लढाईमध्ये पुढचे तीन आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्राने दिले आहेत. कोरोनाकाळात अकारण होणारी गर्दी कठोरपणे रोखावी असाही इशारा केंद्राने दिला आहे.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, नीति आयोग सदस्य डॉ. व्ही. के पॉल व आरोग्य सचिव राजेश भूषण आज कोरोना उपाय योजनांबद्दल एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर भल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांबरोबर संपर्क साधून संचारबंदी, लॉकडाउनला न जुमानता गर्दी करणाऱ्यांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्याचे उपाय करण्याची सूचना केली.

राज्य सरकारांनी पुढच्या तीन आठवड्यांचे नियोजन करून ठेवावे आणि तसेच, रेमडेसिव्हिरसारखी औषधे व कोरोना प्रतिबंधक लशीची मागणी केंद्राकडे नोंदवावी, अशीही सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. १ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर लस बाजारातून खरेदी करण्यासाठी राज्य सरकारांना आत्ताच परवानगी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: कोरोना काळात वरदान! डीआरडीओतर्फे पूरक ऑक्सिजन प्रणाली विकसित

हेही वाचा: देशात कोरोना लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस

देशात सलग तिसऱ्या दिवशी अडीच लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. चोवीस तासांमध्ये होणाऱ्या कोरोना मृत्यूंच्या बाबतीतही भारत ब्राझील आणि अमेरिकेलाही मागे टाकून जगात पहिल्या नंबरवर पोहोचला असून सोमवारी देशातील १,७५७ कोरोनाग्रस्तांनी प्राण गमावले. ब्राझीलमध्ये ही संख्या १४०० - १५०० व अमेरिकेत ४०० ते ६०० आहे. देशातील कोरोनाबळींचा आकडा १ लाख ८० हजार ५५० झाला आहे.

गेल्या चोवीस तासात दोन लाख ५६ हजार ८२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र रविवारच्या तुलनेत ( २.७५ लाख) हा आकडा कमी आहे. देशात महाराष्ट्रासह दहा राज्यांमधून नव्या रुग्ण संख्येपैकी ७८.३७ टक्के रुग्ण आढळत आहेत. सोमवारी एकूण रुग्ण संख्या पैकी २ लाख १० हजार रुग्ण याच दहा राज्यांमधून आढळले. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ५८,९२४, उत्तर प्रदेश २८,२११, दिल्ली २३,६८६, कर्नाटक १५,७८५, केरळ १३,६४४, छत्तीसगड १३,८३४, मध्यप्रदेश १२,८९७, तमिळनाडू १०,९४१, राजस्थान ११,९६७ व गुजरातमधील ११,४०३ लोक नव्याने संक्रमित झाले.