Video: क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना...

वृत्तसंस्था
Thursday, 11 June 2020

कोरोनो व्हायरसमुळे अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. क्वारंटाइनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीनगर : कोरोनो व्हायरसमुळे अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. क्वारंटाइनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शेअर केला आहे.

क्वारंटाइन सेंटरमध्ये केला जबरदस्त डान्स अन्...

उमर अब्दुल्ला यांनी शेअर केलेला व्हिडिओ 37 सेकंदाचा आहे. या व्हिडिओमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये क्रिकेटचा सामना रंगल्याचे दिसत आहे. क्वारंटाइन सेंटरमधील नागरिक मोठ्या उत्साहात सोशल डिस्टन्सचे पालन करून क्रिकेट खेळत असल्याचे दिसते. काहीजण आराम करत आहेत तर काही जण मोठ्या उत्साहात हा सामना खेळताना दिसत आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: विमानावर कोसळली वीज अन्...

संबंधित व्हिडिओ 1 लाखहून अधिक जणांनी पाहिला असून, लाईक्स आणि रिट्वीटही क्षणाक्षणाला वाढताना दिसत आहे. जागा मिळाली तर खेळणार. क्वारंटाइन टाइम पास असे शीर्षक देऊन उमर अब्दुल्ला यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient playing cricket in quarantine centre video viral