क्वारंटाइन सेंटरमध्ये केला जबरदस्त डान्स अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 9 June 2020

कोरोनो व्हायरसमुळे अनेकांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाइन व्हावे लागले आहे. क्वारंटाइनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो रॉकस्टार झाला आहे.

कटिहार (बिहार) : कोरोनो व्हायरसमुळे अनेकांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाइन व्हावे लागले आहे. क्वारंटाइनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो रॉकस्टार झाला आहे.

मॅनेजरने प्रेयसीची छायाचित्रे विकली ऑनलाईन...

बिहारमधील कटिहार येथील एका शाळेत मजुरांना आणि प्रवाशांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये रिंकू आचारी म्हणून काम करत आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये वेळ भरपूर असल्यामुळे अनेकजण मनोरंजनासाठी आपापल्या कलागुणांना वाव देताना दिसतात. क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांनी रिंकूला डान्स करण्याची विनंती केली. रिंकूने नागरिकांच्या आग्रहात्सव 'एक चतुर नार...' या गाण्यावर डान्स केला. त्याच्या या डान्सला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. तर उपस्थितांपैकी काहींनी डान्स मोबाईलमध्ये कैद केला आणि व्हायरल केला. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रिंकू रॉकस्टार झाला आहे.

आई, मी आलेच म्हणाली अन् मारली उडी...

दरम्यान, क्वारंचाइन सेंटरमध्ये जेवण बनवणारा रिंकू एका लहान गावात हॉटेल चालवतो. रिंकू म्हणाला, मला लहानपणापासून डान्स करण्याची आवड आहे. कुणी आग्रह केला किंवा संधी मिळाली तर मी डान्स करतो. माझ्या डान्समुळे क्वारंटाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रवासी आणि मजुरांचे मनोरंजन झाले आहे. डान्समुळे अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ते लवकर बरे होतील.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus cook did a dance in quarantine center at bihar video viral