Corona Updates: चिंताजनक! कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 4 November 2020

गभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना भारतातील कोरोना रुग्ण कमी जास्त होताना दिसत आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना भारतातील कोरोना रुग्ण कमी जास्त होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 514 रुग्णांचा मृत्यू होऊन 46 हजार 254 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंत देशात 83 लाख 13 हजार 877 जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनाने (COVID19) मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 23 हजार 611 वर गेली आहे.  

दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत कोरोनाच्या 53 हजार 357 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशभरात कोरोनाचे 76 लाख 56 हजार 478 जण कोरोनातून सावरले (cured cases) आहेत. सध्या देशात 5 लाख 33 हजार 787 कोरोना रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

'बाबा का ढाबा'च्या बाबांवर यू-ट्यूबरचा मानहानीचा आरोप, 3.78 लाख रुपये दिल्याचा दावा

युरोपात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे बऱ्याच देशांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पण जागतिक स्तरावर कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यू दरात घट झाली आहे.

'बाबा का ढाबा' चा बाबा डेंजरच : आर.माधवन म्हणाला, 'खरंखोटं पाहावं' 

मंगळवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 12 लाख 9 हजार 609 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशभरात 11 कोटी 29 लाख 98 हजार 959 कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in india cross 83 lakh