'बाबा का ढाबा'च्या बाबांवर यू-ट्यूबरचा मानहानीचा आरोप, 3.78 लाख रुपये दिल्याचा दावा

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 4 November 2020

मागील महिन्यापासून दिल्लीतील 'बाबा का ढाबा' मोठा चर्चेत आहे.

नवी दिल्ली: मागील महिन्यापासून दिल्लीतील 'बाबा का ढाबा' मोठा चर्चेत आहे. त्यामध्ये सुरुवातीला बाबाच्या ढाब्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबाला मोठी प्रसिध्द मिळाली होती. ही प्रसिध्दी मिळवून देण्यात यूट्यूबर गौरव वासन याचा मोठा वाटा होता.

मला बदनाम करण्यासाठी हा आरोप- गौरव वासन
आता यूट्यूबर गौरव वासन याने बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्यावर मानहानीचा दावा लावला आहे. गौरवने पुढे सांगितले की, 'मला बदनाम करण्यासाठी कांता प्रसाद यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मी त्यांना मदत व्हावी म्हणून व्हिडिओ करून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.' गौरवने दावा केला आहे की, त्याने आतापर्यंत कांता प्रसाद यांना 3.78 लाख रुपये दिले आहेत.

'बाबा का ढाबा' चा बाबा डेंजरच : आर.माधवन म्हणाला, 'खरंखोटं पाहावं'

गौरवने बाबांचा व्हिडिओ काढला होता-
गौरवने बाबांचा म्हणजे कांता प्रसाद यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला होता, त्यानंतर बाबांचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला होता. तसेच गौरवने बाबांना लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते. 

बाबांनी केले होते आरोप-
यापुर्वी गौरवने लोकांकडून मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रसाद यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मदत म्हणून कांता प्रसाद यांना पैसे पाठवण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तींचे बॅंक डिटेल्स दिले होते, ज्यावर मदत म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यात आले आहेत. गौरवने अनेक पैशांचे व्यवहार परस्पर केले आणि ते लपविले अशी तक्रार कांता प्रसाद यांनी पोलिसांत केली होती. 

US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत 

आर माधवनची बाबांवर टिका-
कांता प्रसाद यांच्यावर सोशल मीडियातून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. यावर अभिनेता आर माधवन याने कांता प्रसाद यांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, गौरवमुळे कांता प्रसाद यांना ओळख मिळाली होती. त्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतही मिळाली. विशेष म्हणजे 80 वर्षीय कांता प्रसाद यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माधवन म्हणाला, एखाद्या वृध्द व्यक्तीला मदत करुन गौरवने एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यासाठी त्याचे कौतूक करायला हवे. कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपामुळे आणि गौरवच्या समर्थनार्थ व्टिट केलेल्या माधवनवर मोठ्या प्रमाणात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. माधवन म्हणतो. कांता प्रसाद याच्यावर करण्यात आलेले आरोप जर चूकीचे असतील तर त्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. यासगळ्या प्रकरणात कोण चूक आणि कोण बरोबर हे पाहावे लागेल. अशाप्रकारे एखाद्याला मदत करुनही जर संबंधित व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार केल्यास समाजात वेगळ्या प्रकारचा संदेश पसरायला वेळ लागत नाही. आपल्या सर्वांना चांगल्या कामासाठी योगदान द्यायचे आहे.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youtuber gaurav vasan claims on kanta prasad of baba ka dhaba