esakal | Corona Updates: दिलासादायक! जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

updates corona

भारतातील कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत आहे. जगभरात काही ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील कोरोना स्थिती दिलासादायक आहे.

Corona Updates: दिलासादायक! जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी मृत्यू

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतातील कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत आहे. जगभरात काही ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील कोरोना स्थिती दिलासादायक आहे. जगाच्या तुलनेत भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी कोरोना मृत्यू झाले आहेत. देशात आतापर्यंत प्रति 10 लाख लोकसंख्येमागे सरासरी 80 मृत्यू झाले आहेत. जी इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

राज्यांचा विचार केला तर त्रिपुरा या राज्यात देशाच्या सरासरीच्या जवळ 77 रुग्ण प्रति 10 लाख लोकसंख्येमागे दगावले आहेत. तर सर्वात कमी बिहार आणि नागालॅंडमध्ये अनुक्रमे 10 आणि 8 मृत्यू झाले आहेत. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत खूपच कमी रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने ती एक दिलासादायक बाब आहे.

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 895 रुग्णांचा मृत्यू होऊन नवीन 63 हजार 371 रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 73 लाख 70 हजार 469 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 64 लाख 53 हजार 780 जण कोरोनामुक्त झाले असून 8 लाख 4 हजार 528 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 1 लाख 12 हजार 161 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) सांगितले आहे. 

गुरुवारी एका दिवसात कोरोनाच्या 10 लाख 28 हजार 622 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 9 कोटी 22 लाख 54 हजार 927 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

'रस्ते हे देखील सार्नजनिक ठिकाण आहे. रस्त्याने जाताना नेहमी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्कही घातला पाहीजे. गाडी चालवताना नेहमी सहा फुटाचे अंतर ठेवले पाहीजे, अशी माहिती ट्विट करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.