खासगी लॅबमध्ये 30 जण पॉझिटिव्ह; सरकारीमध्ये निगेटिव्ह

corona report 30 people private lab positive and negative government at kanpur
corona report 30 people private lab positive and negative government at kanpur

कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूर शहरामधील 30 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह आला आहे. खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या लॅबमध्ये ज्या ३० लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांचा सरकारी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. २० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या रुग्णाने लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने दुसर्‍या प्रयोगशाळेतही त्याची चाचणी केली होती. मात्र, त्याठिकाणी अहवाल निगेटिव्ह आला. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्या व्यक्तीने लॅबची तक्रार केली.

प्रशासाने तक्रारीनंतर चौकशी सुरू केली. यावेळी अनेक रूग्णांची नावे, पत्ते आणि मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवली असल्याचे आढळून आले. अधिकारी आलोक तिवारी यांनी सांगितले की, 'पॉझिटिव्ह रूग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहणे, चाचणीसाठी जास्त पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर लॅबला सील केले. पुढील तपास सुरू आहे. शिवाय, या चौकशीदरम्यान २० सप्टेंबरच्या तीन दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी कागदपत्रांची पडताळणी केली. लॅबने ज्या लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ३० कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेल्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप १२ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. ३० पॉझिटिव्ह सहा दिवसांत निगेटिव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

दरम्यान, देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून आतापर्यंत ५७ लाखांहून जास्त नागरिक बाधित झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com