
गांधीनगर येथे एसीएसने केलेल्या कारवाईमध्ये 99 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचे एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे.
अहमदाबाद (गुजरात): गांधीनगर येथे एसीएसने केलेल्या कारवाईमध्ये 99 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचे एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे.
Video: राजकीय नेते काय करतीय सांगता येत नाही...
गुजरात एटीएसने सांगितले की, मनिष संघांनी (पटेल, वय ४२) हा मोरबी जिल्ह्यातील हळवद तालुक्यातील घनश्यामगढ येथील रहिवाशी आहे. संघांनी याच्या मोटारीमध्ये या नोटा सापडल्या आहेत. गांधीनगरमधील सेक्टर २८मध्ये ही मोटार पकडली. मोटारीची तपासणी केल्यानंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या.
'ओळख असणाऱयांनाच मिळतो आयसीयू बेड'
दरम्यान, एटीएसने 29 जुलै रोजी गोंध्रा येथील पंचमहलमध्ये अशीच एक कारवाई केली होती. त्यावेळी दोघांकडून ४ कोटी ७६ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.