कोरोनाचा धोका वाढला! यूपीत सार्वजनिक जागी पुन्हा मास्क आनिवार्य

mask
maskesakal

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी राजधानी लखनऊ आणि एनसीआरमधील सहा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे अनिवार्य केले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा परिणाम राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (National Capital Region) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांवर झाला आहे. एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, हे लक्षात घेऊन सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत गौतम बुद्ध नगरमध्ये 65, गाझियाबादमध्ये 20 आणि लखनऊमध्ये 10 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला फेस मास्क घालण्यास सूट दिली होती. पण आता अनेक जिल्ह्यांमध्ये फेस मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने लोकांना फेस मास्कपासून सूट दिली आहे. त्यानंतर दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असून संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे.

mask
कोरोना मृत्यूमुळे वाद, PM मोदींसह WHO प्रमुख गुजरात दौऱ्यावर

रविवारी दिल्लीत कोरोनाचे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. पॉझिटीव्हीटी रेट 4.21 टक्के नोंदवला गेला आहे. रविवारी आलेल्या नवीन रुग्णांसह राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत एकूण 18,68,550 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि संसर्गामुळे 26,160 लोकांचा मृत्यू झाल्याचे कन्फर्म झाले आहेत. शनिवारी, दिल्लीत कोरोनाचे 461 नवीन रुग्ण आढळले, तर दोन लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

mask
चोवीस तासात दुप्पट रुग्ण! 2000 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com