
नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या (India Corona Update) तिसऱ्या लाटेमुळे नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी देशात नवीन रुग्णांच्या (New Cases) संख्येत घट झाली. तर गेल्या 24 तासात 4000 जणांना प्राण (Death due to corona) गमवावे लागले आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 43 हजार 144 नवीन रुग्ण सापडले असून 3 लाख 44 हजार 776 जण कोरोनामुक्त (Covid 19 negative) झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry of India) दिली आहे. आतापर्यंत भारतात 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 2 कोटी 79 हजार 599 जण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 62 हजार 317 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.देशात सध्या 37 लाख 4 हजार 893 सक्रीय रुग्ण आहेत. (corona update 14 may 2021 india discharge patient more than new cases)
कोरोनाच्या उद्रेकामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि कडक निर्बंध आहेत. देशातील या 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 42 हजार 582 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 54 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 24 तासांत 850 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 52 लाख 69 हजार 292 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 6 लाख 54 हजार 731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 78 हजार 857 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी सापडत आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 33 हजार 294 सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात जगात जवळपास 7 लाख 51 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 13 हजार 843 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण भारतात सापडत असून त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 76 हजार 638 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या कमी असली तरी ब्राझीलमध्ये मृत्यूदर मात्र जास्त आहे. तिथे दिवसभरात 2 हजार 545 जणांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.