Corona News: कोरोनाचा खेळ खल्लास! आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल भारतानं करून दाखवलं

Corona Update big victory over corona after 32 months not single death cases reported in country
Corona Update big victory over corona after 32 months not single death cases reported in country sakal

देशात कोरोना महामारीचा वेग सध्या मंदावला आहे. यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत देशात 625 कोविड-19 रुग्ण आढळले आहेत. 9 एप्रिल 2020 नंतर इतके कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

तसेच मागील 24 तासांच्या कालावधीत देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णांची संख्या 4,46,62,141 वर गेली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 14,021 वर आली आहेत. यासोबतच मृतांची संख्या 5,30,509 वर कायम आहे.

देशात 9 एप्रिल 2020 रोजी एकाच दिवसात एकूण 540 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. दरम्यान मार्च 2020 नंतर पहिल्यांदा मागील 24 तासात देशात एकाचाही मृत्यू झालेला नाही. कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय व्यक्ती भारतात कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, एकूण प्रकरणांपैकी 0.03 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.78 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Corona Update big victory over corona after 32 months not single death cases reported in country
Anil Parab: अनिल परब यांना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4,41,17,611 झाली आहे, तर मृत्यूदर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 219.74 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Corona Update big victory over corona after 32 months not single death cases reported in country
Abdul Sattar Controversy: सत्तारांच्या वादग्रस्त टीकेवर 'जय हिंद जय महाराष्ट्र' करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भारतातील कोरोना ची आकडेवारी 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांचा आकडा पार केला होता. 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला एक कोटीचा टप्पा पार केला. भारतात 4 मे रोजी 2 कोटी, गेल्या वर्षी 23 जून रोजी 3 कोटी आणि यावर्षी 25 जानेवारी रोजी 4 कोटी प्रकरणांची नोंद झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com