Corona Update : दिलासादायक! गेल्या जूनपासून पहिल्यांदाच 10 हजारच्या खाली रुग्णसंख्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,06,76,838 वर जाऊन पोहोचली आहे.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 9,102 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,06,76,838 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 15,901 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,03,45,985 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,53,587 वर पोहोचली आहे. सध्या देशात एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,77,266 आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात 20,23,809 लोकांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 7,25,577 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,30,62,694 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे. 

काल महाराष्ट्रात 1,842 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,10,948 वर पोहोचली आहे. काल राज्यात 3,080 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसहे राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,15,344 वर पोहचली आहे. काल राज्यात 30 जणांचा मृत्यू  झाला आहे. या नव्या मृतांसह एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,815 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 43,561 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Cases Drop Below 10,000 For the First Time Since June