esakal | Corona Update : देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

युरोपातील अनेक देशांत सध्या दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

Corona Update : देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ ही सुरुच आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणुमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. युरोपातील अनेक देशांत सध्या दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशात सध्या दिवाळीचा सण साजरा केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या देशात 50 हजारच्या आसपास नवे रुग्ण दररोज सापडत आहेत. मात्र, ही संख्या वाढून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

काल शुक्रवारी देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 87.28 लाखांवर जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी एका दिवसात 44,879 इतके रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 81,15,580 रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट हा 92.97 इतका झाला आहे. गेल्या चोविस तासांत देशात 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संख्येसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,28,668 वर जाऊन पोहोचली आहे. आजवर सापडलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 87,28,795 झाली आहे. कोरोना मृत्यूदर हा 1.47 पर्यंत घसरला आहे. सध्या देशात 4,84,547 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 8115580 इतक्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. गेल्या चोविस तासात 9,29,491 कोरोना टेस्ट केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत देशात 12,40,31230 इतक्या कोरोना टेस्ट केल्या गेल्या आहेत. 

loading image