Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 224 रुग्णांचा मृत्यू; देशात आज लशीकरणाचे 'ड्राय रन'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

काल एका दिवसात महाराष्ट्रात 3,524 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षापासून जगावर मोठे संकट बनून उभे ठाकलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या जगभरात लशीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्त्रायल अशा युरोपियन देशांमध्ये लशीकरणास सुरवात करण्यात आली आहे. भारतात देखील ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली असून आज देशात 'ड्राय रन' अर्थात सराव फेरी घेण्या येत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 19,078 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतात आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,03,05,788 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह भारतातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,49,218 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात एकूण 2,50,183 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 22,926 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण  बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 99,06,387 वर जाऊन पोहोचली आहे. काल एका दिवसात 8,29,964 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,39,41,658 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे.

काल एका दिवसात महाराष्ट्रात 3,524 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या19,35,636 वर जाऊन पोहोचली आहे. काल एका दिवसात राज्यात 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या ही 49,580 वर जाऊन पोहोचली आहे. काल 4,279 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,32,825 वर जाऊन  पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,084 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 

अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या पार गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 20,007,149 कोरोनाचे संक्रमित आढळले आहेत. आणि यापैकी 346,408 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या भीषण अशा आकडेवारीमुळे अमेरिका हा देश जगातील सर्वाधिक कोरोना संक्रमित तसेच कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेला देश बनला असल्याची माहिती युनिव्हर्सिटीकडून देण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India 2 January 2021 Marathi Report