Corona Update : गेल्या 24 तासांत देशात नवे 18,177 रुग्ण; काल राज्यात 51 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

सीरमच्या लशीला मिळालेल्या मंजुरीनंतर स्वदेशी भारत बायोटकेच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 18,177 रुग्ण सापडले. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1,03,23,965 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 20,923 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 99,27,310 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 217 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,49,435 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,47,220 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.    

काल एका दिवसात 9,58,125 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,48,99,783 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर राज्यात काल एका दिवसात 3,218 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,38,854 वर जाऊन पोहोचली आहे.  काल एका दिवसांत राज्यात 2,110 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 18,34,935 रुग्ण बरे झाले आहेत. काल एका दिवसात राज्यात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 49,631 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात सध्या 53,137 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.

सीरमच्या लशीला मिळालेल्या मंजुरीनंतर आणखी एक आनंदाची बातमी भारतीयांना मिळत आहे. स्वदेशी भारत बायोटकेच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीला सलग दोन दिवस भारतीयांना दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. 

स्वदेशी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याबाबात आज तज्ज्ञांची बैठक पार पडली. भारत बायोटेकची लस पहिली लस आहे जी देशातील सर्वोच्य आरोग्य संस्था आयसीएमआरच्या सहयोगाने बनवली जात आहे. भारत बायोटेकला मंजुरी मिळाल्याने ती पहिली स्वदेशी कोविड लस ठरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India 3 January 2021 Marathi