दिलासादायक! देशात ९ महिन्यांनंतर नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी| India Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

देशात २८७ दिवसांनंतर सर्वात कमी नवे रुग्ण आढळले आहे. दहा हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद २४ तासात झाली.

दिलासादायक! देशात ९ महिन्यांनंतर नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहे. रविवारी नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र मंगळवारी भारताला मोठा दिलासा मिळाला असून नव्या रुग्णसंख्येसह सक्रीय रुग्णांमध्येही घट झाली आहे. देशात २८७ दिवसांनंतर सर्वात कमी नवे रुग्ण आढळले आहे. दहा हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद २४ तासात झाली.

देशात गेल्या २४ तासात ८ हजार ८६५ नवे रुग्ण सापडले. तर ११ हजार ९७१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. दिवसभरात १९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ७९३ इतकी आहे. गेल्या ५२५ दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ०.८० टक्के इतका आहे. मागील ४३ दिवसांपासून हा रेट २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.९७ टक्के असून तो ५३ दिवसांपासून २ टक्क्यांच्या खाली आहे.

हेही वाचा: समलैंगिक होणार न्यायाधीश; भारतीय न्यायव्यवस्थेत घडला इतिहास

देशात सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. कालच्या देशातील एकूण रुग्णसंख्येत ५० टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत. गेल्या २४ तासात केरळमध्ये ४ हजार ५४७ नवे रुग्ण आढळले. तर ६ हजार ८६६ जण कोरोनामुक्त झाले. २४ तासात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

loading image
go to top