ऐतिहासिक! भारतात समलैंगिक सौरभ कृपाल बनले न्यायाधीश

saurabh krupal
saurabh krupalesakal

नवी दिल्ली : केवळ न्यायव्यवस्थेसाठीच नाही तर देशासाठीही एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं प्रथमच एका समलैंगिक ज्येष्ठ वकिल यांना दिल्ली हायकोर्टाचे जज बनवण्याची शिफारस केली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारतीय समाज व्यवस्थेसाठीही क्रांतीकारक ठरणारा आहे. कोण आहेत ते ज्येष्ठ वकील?

देशातले पहिले समलैंगिक जज.

सुप्रीम कोर्टानं जे स्टेटमेंट जारी केलंय, त्यात असं म्हटलंय की, 11 नोव्हेंबरला कॉलेजियमची बैठक झाली आणि त्यात सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. विशेष म्हणजे माजी सरन्यायधीश एसए बोबडे यांनी केंद्र सरकारकडे कृपाल यांना जज बनवण्यावर विचारणा केली होती. त्यावर केंद्रानं मत स्पष्ट करावं असही बोबडे म्हणाले होते. सौरभ कृपाल यांच्या नावाची पहिल्यांदाच शिफारस होतेय. यापूर्वीही 4 वेळेस विचारविनिमय झाला पण मतभेद उघड झाले. 2017 मध्ये पहिल्यांदा सौरभ कृपाल यांना जज बनवण्याची शिफारस केली गेली होती. पण आता या शिफारशीवर शिक्कामोर्तब झाले तर ते देशातले पहिले समलैंगिक जज होतील. फक्त कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं एखाद्या गे व्यक्तीला जज करण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतलाय.

कोण आहेत सौरभ कृपाल?
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय. तर ऑक्सफर्डमधून त्यांनी लॉची डिग्री घेतलीय. लॉमध्येच पोस्ट ग्रॅज्युएट कृपाल यांनी केंब्रिजमधून पूर्ण केलंय. गेल्या दोन दशकापासून ते सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करतायत. यूएनसोबतही कृपाल यांनी जिनेव्हात काम केलंय. सौरभ कृपाल यांनी जे महत्वाचे खटले लढले त्यात नवतेजसिंह जोहर विरुद्ध भारत सरकारचा समावेश आहे. तसच कलम 377 हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याचे ते वकिल होते. 2018 मध्ये हे कलम रद्द केलं.

saurabh krupal
Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश | Madhya Pradesh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com