Corona Update : गेल्या 24 तासांत 17,652 रुग्ण बरे; 198 रुग्णांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

गेल्या 24 तासांत 7,43,191 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली :  गेल्या 24 तासांत देशात 16,946 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,05,12,093 वर जाऊन  पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 17,652 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,46,763 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण मृतांची संख्या ही 1,51,727 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,13,603 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 7,43,191 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,42,32,305 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 3556 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल नवीन 3009 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजवर एकूण 18,74,279 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52,365 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.75% झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Maharashtra marathi report 14 january 2021