esakal | Corona : लसीकरणाच्या 2 ऱ्या टप्प्यात PM मोदींनी घेतली लस; काल देशात 106 रुग्णांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona update}

काल देशात 6,27,668 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Corona : लसीकरणाच्या 2 ऱ्या टप्प्यात PM मोदींनी घेतली लस; काल देशात 106 रुग्णांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीमधील AIIMS मध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. याबाबतची माहिती स्वत: नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. यावेळी मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, दिल्लीतील AIIMS मध्ये कोरोना लसीचा पहिला खुराम मी घेतला. कोरोना विरोधातील जागतिक लढाईत आपल्या संशोधकांनी तसेच डॉक्टर्सनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. जे लस घेण्यास पात्र आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की चला, भारताला कोरोनामुक्त बनवुया!

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 15,510 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल देशात 11,288 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,86,457 वर पोहोचली आहे.

हेही वाचा - ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

काल देशात 106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण मृतांची संख्या ही  1,57,157 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,68,627 वर पोहोचली आहे. भारतात गेल्या 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत 1,43,01,266 जणांना लच दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशात 6,27,668 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण चाचण्यांची संख्या ही 21,68,58,774 वर पोहोचली आहे. याबाबातची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे नवे 8,293 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 21,55,070 वर पोहोचली आहे. काल राज्यात 3,753 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही  20,24,704 वर पोहोचली आहे. राज्यात काल 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 52,154 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 77,008 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

भारतात गेल्या 16 जानेवारी रोजी लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. या लसीकरण मोहीमेमध्ये सर्वांत आधी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. आज एक मार्चपासून भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. या टप्प्यातील मोहीमेमध्ये देशभरातील जवळपास 10 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आता सुमारे 1.5 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणामध्ये 60 वर्षे वयावरील लोकांना तसेच 45 ते 59 वर्षे वयामधील कोमोर्बिडीटीज अर्थात इतर आजार असलेल्या लोकांना ही लस घेता येणार आहे.