Corona Update : नव्या स्ट्रेनचे 20 रुग्ण आढळले; गेल्या 24 तासांत 286 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

कोरोनाचा नवा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असून आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो.

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सापडला होता. हा नवा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असून आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. त्यामुळे जगभरात वेगाने हा आपले  हातपाय पसरत असल्याचे पहायला मिळत आहे. या नव्या स्ट्रेनचे भारतात आतापर्यंत 20 रुग्ण आढळल्याची माहिती मिळते आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आटोक्यात असली तरीही काळजी घेण्याचे संकेतच प्रशासनाकडून मिळत आहेत. 

गेल्या 24 तासांत भारतात 20,550 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,02,44,853 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 26,572 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह एकूण आजवरच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 9,83,4141 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,62,272 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांच्या आकडेवारीसह आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,48,439 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  

गेल्या 24 तासांत देशात 11,20,281 कोरोना चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह आजवर देशात एकूण 17,09,22,030 चाचण्या केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता ती आटोक्यात आहे. काल मंगळवारी महाराष्ट्रात 3,018 नवे रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 19,25,066 वर जाऊन पोहोचली आहे. कालच्या दिवसात 5,572 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह आजवर महाराष्ट्रात एकूण 18,20,021 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 54,537 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. काल एका दिवसात 68 रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची आकडेवारी ही 49,373 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा 94.54% आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update india marathi 30 december