Corona : नवी रुग्णसंख्या 10 हजारच्या आत; गेल्या 24 तासांत 81 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 9,121 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,09,25,710 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 11,805 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,33,025 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही  1,55,813 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,36,872 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत 87,20,822 जणांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 6,15,664 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 20,73,32,298 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यात काल 3,365 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,67,643 वर पोहोचली आहे. राज्यात काल 3,105 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,78,708 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 36,201 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. राज्यात काल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यांसह एकूण कोरोना मृतांची संख्या ही 51,552 वर पोहोचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi Report 16 February