Corona Update : गेल्या 24 तासांत नवे 15,144 रुग्ण; 181 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

 काल देशभरात लसीकरणास सुरवात झाली.

नवी दिल्ली : काल देशभरात लसीकरणास सुरवात झाली. देशात ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रामध्ये ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील एक लाख 65 हजार करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा टोचण्यात आली.

भारतात काल कोरोनाचे नवे 15,144 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,57,985 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 17,170 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,96,885 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 181 रुग्णांचा मृत्यू झाला. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,52,274 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,08,826 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशभरात कोरोनाच्या लसीकरणास सुरवात करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल 1,65,714 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणामध्ये तीन कोटी आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर कुणावरही काहीही विपरित परिणाम झाल्याची घटना नोंदवली गेली नाहीये.

काल दिवसभरात महाराष्ट्रात 2910 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 19,87,678 वर पोहोचली आहे. काल महाराष्ट्रात 3039 रुग्ण बरे झाले. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण  बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,84,127 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 52 रुग्णांचा मृत्यू झाला. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,388 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 51,965 वर जाऊन पोहोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi Report 17 January 2021