Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 234 रुग्णांचा मृत्यू; राज्यात आज लसीकरणाची ड्राय रन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

काल महाराष्ट्रात राज्यात 3,729 नवे रुग्ण सापडले आहेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या 24 तासांत भारतात 18,139 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1,04,13,417 वर जाऊन पोहोचली आहे. काल एकूण 20,539 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,37,398 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 1,50,570 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,25,449 वर आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल दिवसभरात देशात एकूण 9,35,369 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या चाचण्यांची संख्या ही 17,93,36,364 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती ही Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्रात राज्यात 3,729 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,58,282 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात एकूण 3,350 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,56,109 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 49,897 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 51,111 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi Report 8 january 2021