Corona Update : देशात दीड लाख नवे रुग्ण; ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजार ६२३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची संख्या १ हजारांपेक्षा जास्त असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत ५०० रुग्ण आढळले आहेत.

देशात दीड लाख नवे रुग्ण; ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजार ६२३

भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या २४ तासात दीड लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. शनिवारी दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ६३२ कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट वाढत चालला असून तो १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात ५ लाख ९० हजार ६११ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. भारतातील २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजार ६२३ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १४०९ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद असून तो आकडा १ हजाराच्या वर पोहोचला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीत पाचशेपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण नोंद झाले आहेत.

देशात सर्वाधिक महाराष्ट्रात ४१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्याखालोखाल दिल्लीत २० हजार तर बंगालमध्ये १८ हजार रुग्ण शनिवारी आढळले. देशातील १० राज्यात १ लाख २६ हजार नव्या रुग्णांची नोंद काल दिवसभरात झाली.

शुक्रवारी देशात १ लाख ४१ हजार ९८६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर त्याआधी गुरुवारी १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ५५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ कोटी ४४ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiacovid 19omicron
loading image
go to top